'साखर आयुक्तांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे पैसे देण्याची कार्यवाही सुरू'| Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 0

कऱ्हाड ""राज्यातील ज्या कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही, त्यांच्यावर आरआरसीची कारवाई केली जाते. त्यातून कारखान्यांकडील शिल्लक साखर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विकून त्यातून शेतकऱ्यांचे देणे भागवले जाते. अशा कारवाया साखर आयुक्तालयाकडून सुरूच आहे,'' अशी स्पष्टोक्ती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी गुरुवारी (ता.25 मार्च) माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी बोलताना केली. साखर कारखान्यांकडील थकीत एफआरपी आणि वीजबील माफ करावी, या मागणीसाठी शेट्टी यांच्या उपस्थितीत आज (ता. 25 मार्च) सह्याद्री कारखान्यावर आंदोलन होणार होते. मात्र, तत्पूर्वीच पोलिसांनी महामार्गावरून शेट्टी यांना येथील शासकीय विश्रामगृहात आणले. तेथे सहकारमंत्री पाटील व शेट्टी यांची याप्रश्नी चर्चा झाली. त्याची माहिती देताना सहकारमंत्री पाटील यांनी वरील उत्तर दिले.
#Karad #Sugarfactory
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires